सांगली येथील प्रसिद्ध पुरोहित पांडुरंग दांडेकर यांचे निधन
सांगली – येथील प्रसिद्ध पुरोहित श्री. पांडुरंग शंकर दांडेकर (वय ९० वर्षे) यांचे ७ सप्टेंबर या दिवशी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुली, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सांगली पंचक्रोशीत ‘दांडेकरगुरुजी’ या नावाने ते प्रसिद्ध पुरोहित होते. त्या काळी संस्थानच्या वेद शाळेत त्यांनी पठण केले. अनेक वर्षे त्यांनी लक्ष्मीनारायण मंदिराचे पौरोहित्य केले. दांडेकर सभागृहाचे मालक श्री. वासुदेव अन् श्री. विद्याधर यांचे ते वडील होते. सनातन परिवार दांडेकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.