काँग्रेसशासित कर्नाटकातील कृषी मंत्र्यांवर घोटाळ्याचा आरोप : अधिकार्याचा आत्महत्येचा प्रयत्न
कलबुर्गी (कर्नाटक) – कृषी मंत्री चेलुवराय स्वामी आणि कृषी विभाग यांच्यावर ठपका ठेवत धर्मराज नावाच्या कृषी विभागाच्या एका अधिकार्याने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. धर्मराज हे जेवर्गी तालुक्यात कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
धर्मराज यांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मला मानसिक छळ सहन करावा लागत आहे. माझे स्थानांतर करण्यात येऊ नये, ही माझी विनंती मान्य करण्यासाठी माझ्याकडून २ लाख ५० सहस्त्र रुपये घेण्यात आले. विजयपूर जिल्ह्यात स्थानांतर करण्याचे सांगून मला ब्लॅकमेल करण्यात आले.
संपादकीय भूमिका‘काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार’, असे समीकरणच झाले आहे. आता या आरोपातही तथ्य आढळ्यास आश्चर्य वाटू नये आणि संबंधित मंत्र्यावर कारवाई झाली नाही, तरी जनतेने त्याचे वैफल्य वाटून घेऊ नये ! |