दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या छायाचित्राविषयी साधिकेला जाणवलेली सूत्रे
‘२१.९.२०२३ या दिवशी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे छायाचित्र दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आले होते. त्या छायाचित्राकडे बघून मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या छायाचित्राकडे पाहून मला ‘ते पुष्कळ प्रेमाने बघत आहेत आणि ते माझ्याशी बोलत आहेत’, असे वाटले.
२. त्या छायाचित्राकडे ‘पहातच रहावे’, असे मला वाटत होते.
३. ‘सद्गुरु राजेंद्रदादा काहीतरी सांगत आहेत’, असे मला जाणवत होते.
४. त्यांच्या छायाचित्रातील डोळ्यांत अत्यंत प्रेम, आपलेपणा आणि वात्सल्य जाणवले.
५. छायाचित्रातील त्यांच्या चेहर्यावरील त्वचा तेजस्वी, नितळ आणि चमकदार वाटली.
६. त्यांच्या चेहर्यातून ‘आनंद, शांती आणि चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.
७. सद्गुरु राजेंद्रदादांचे छायाचित्र पाहून मन आनंदी होते.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच सद्गुरु राजेंद्रदादांच्या छायाचित्रातील ही वैशिष्ट्ये माझ्या लक्षात आली. त्याबद्दल परात्पर गुरु डॉक्टर आणि सद्गुरु राजेंद्रदादा यांच्या चरणी कृतज्ञता !’
– कु. स्वाती बाळकृष्ण शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |