ईश्वरी चिंतनात मन एकाग्र केल्यास खर्‍या अर्थाने अध्यात्माचा मार्ग सापडेल !

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अनमोल शिकवण !

प.पू. दादाजी वैशंपायन

‘मनन, चिंतन आणि ध्यान यांमध्ये एकाग्र होण्याचा प्रयत्न करा. ईश्वरी चिंतनात मन एकाग्र झाल्यानंतर तेथे तल्लीन व्हा. जेव्हा मन चिंतनात एकरूप होईल, तेव्हा खर्‍या अर्थाने अध्यात्माचा मार्ग सापडेल ! आत्मपरीक्षणासाठी ही पद्धत अवलंबल्यास काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर यांसारखे षड्रिपू आपल्यापासून दूर जातील. हे मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे.’ (१८.७.२००८)