No Cricket With Bangladesh : भारत-बांगलादेश क्रिकेट मालिका रहित करा ! – हिंदूंची जोरदार मागणी

  • बांगलादेशातील हिंदूंच्या चालू असलेल्या नरसंहाराचे प्रकरण

  • बीसीसीआयचे दुर्लक्ष !

मुंबई : बांगलादेशात गेल्या ५ आठवड्यांपासून हिंदूंचा नरसंहार चालू आहे. देशातील ६४ जिल्ह्यांपैकी किमान ५० जिल्ह्यांमध्ये हिंदूंना लक्ष्य करण्यात आले आहे. या दृष्टीने भारतात लवकरच होणार्‍या भारत-बांगलादेश क्रिकेट मालिकेला भारतातील हिंदूंकडून मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (‘बीसीसीआय’कडे) ही मालिका रहित करण्याची मागणी केली जात आहे. यासाठी ‘एक्स’वर ‘#NoCricketWithBangladesh’ या ‘हॅशटॅग’ वापरून आतापर्यंत सहस्रो हिंदूंनी पोस्ट केल्या आहेत. तथापि हिंदूंच्या या मागणीकडे बीसीसीआयने अद्यापपर्यंत दुर्लक्ष केले आहे.

बीसीसीआयकडून ई-मेलला साधे उत्तरही नाही !

यासंदर्भात ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने बीसीसीआयला त्याच्या अधिकृत पत्त्यावर ई-मेल करून त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला; परंतु २४ घंटे उलटून गेल्यानंतरही बीसीसीआयकडून कोणतेच उत्तर आले नाही. त्यामुळे ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने बीसीसीआयच्या मुंबईतील मुख्यालयात दूरभाषद्वारे संपर्क साधला. मंडळाच्या कर्मचार्‍यांकडून आधी या विषयावर उत्तर देण्यास टाळाटाळ केली जात होती; परंतु सातत्याने संपर्क केल्यानंतर ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी राकेश सिंह नावाच्या अधिकार्‍याशी चर्चा झाली.

बीसीसीआयच्या अधिकार्‍याकडून उडवाउडवीची उत्तरे !

या वेळी बीसीसीआयचे अधिकारी राकेश सिंह यांनी सांगितले की, तुम्ही आम्हाला अमुक पत्त्यावर ई-मेल करा. ई-मेल करून २४ घंटे झाल्याचे सिंह यांना सांगितल्यावर त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देत म्हटले की, आमचे सर्व अधिकारी सध्या फिरतीवर आहेत. तुम्हाला २-३ दिवसांत आमच्याकडून उत्तर येईल. भारत-बांगलादेश क्रिकेट मालिका अवघ्या आठवड्यांवर आली असतांना कुणाशी तरी बोलू द्यावे, अशी प्रतिनिधीने विनंती केल्यानंतरही सिंह यांनी त्यास दाद दिली नाही.

बीसीसीआयचा संपर्क

प्रखर धर्मप्रेमी नागरिक पुढील पत्त्यावर संयत मार्गाने निषेध नोंदवत आहेत :

ई-मेल पत्ता : office@bcci.tv

संपर्क क्रमांक : (०२२) ६७५९ ८८००, (०२२) ६१५८ ०३००


राष्ट्रद्रोही आणि हिंदुद्रोही घटनांचा संयत मार्गाने निषेध करा !

हिंदुद्रोह्यांचा निषेध करण्यामागचा मुख्य उद्देश त्यांचे वैचारिक परिवर्तन करणे, हा आहे. त्यामुळे कोणाचाही निषेध करतांना तात्त्विक सूत्रांच्या आधारे वैचारिक स्तरावर करा ! चुकणाऱ्या व्यक्तीला तिच्या चुका सांगून योग्य मार्गावर आणणे, हा व्यापक दृष्टीकोन निषेध व्यक्त करण्यामागे हवा !


संपादकीय भूमिका

जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेले ‘बीसीसीआय’ हे भारतियांसाठी आहे कि केवळ पैसे कमावण्यासाठी ? बांगलादेशाशी क्रिकेट खेळणे, म्हणजे हिंदूंच्या धर्मभावनांशी खेळणे होय. त्यामुळे ही मालिका रहित करण्यासाठी समस्य हिंदूंनी बीसीसीआयच्या प्रशासनावर दबाव आणला पाहिजे !