Bihar BJP Leader Attacked : बिहारमध्ये भाजपच्या नेत्यावर आक्रमण
आधी बाँबफेक आणि नंतर चाकूने वार; प्रकृती गंभीर
भागलपूर (बिहार) – येथे भाजपच्या नेते तथा जिल्हा प्रवक्ते शशी मोदी यांच्यावर गुंडांनी बाँबद्वारे आक्रमण केले. यात ते घायाळ होऊन खाली पडल्यानंतर गुंडांनी त्यांच्यावर चाकूद्वारे आक्रमण केले. या वेळी मोदी यांच्यासमवेत असणार्या त्यांच्या साथीदारावरही आक्रमण करण्यात आले. घायाळ अवस्थेत त्यांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
🚨Attack on a BJP Leader in Bihar ; His condition is critical
💥A bomb was thrown and later on he was stabbed
👉Such an incident is not expected when the BJP-led alliance is in power in the state#BiharkiNDAsarkar #BJP #BiharPolice #NDA #Bhagalpur pic.twitter.com/gp6bVFbvVE
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 10, 2024
छेडछाड करणार्यांना हटकल्याने आक्रमण झाल्याची शक्यता !
या घटनेविषयी स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, आक्रमणाची घटना ९ सप्टेंबरला मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. कुतुबगंज येथील गणेश पूजा मंडपामध्ये लोकांची गर्दी होती. त्यानंतर काही मद्यधुंद युवकांनी तेथील महिलांची छेड काढली, तसेच एका तरुणाचा भ्रमणभाष हिसकावून घेतला. तेव्हा तेथे उपस्थित असलेले शशी मोदी यांनी या युवकांना हटकले. या वेळी संबंधित युवकांशी त्यांची झटापट झाली. यामुळेच त्यांच्यावर आक्रमण करण्यात आल्याची शक्यता आहे.
संपादकीय भूमिकाराज्यात भाजपची सत्ता असतांना अशी घटना घडणे अपेक्षित नाही ! |