Manipur Unrest : मणीपूरमधील ३ जिल्‍ह्यांत संचारबंदी !

इंफाळ – मणीपूरमधील वाढत्‍या हिंसाचाराच्‍या पार्श्‍वभूमीवर राज्‍य सरकारने ३ जिल्‍ह्यांत संचारबंदी लागू केली. या ३ जिल्‍ह्यांपैकी इंफाळच्‍या पूर्व आणि पश्‍चिम जिल्‍ह्यांमध्‍ये अनिश्‍चित काळासाठी, तर थौबलमध्‍ये काही कालावधीसाठी संचारबंदी लागू करण्‍यात आली आहे. लोकांना घराबाहेर पडण्‍यास मज्‍जाव करण्‍यात आला आहे. सरकारने १० सप्‍टेंबर या दिवशी सकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल केली होती; परंतु पुन्‍हा हिंसाचार उफाळल्‍याने ही शिथिलता मागे घेत अनिश्‍चित काळासाठी पुन्‍हा संचारबंदी लागू करण्‍यात आली. तथापि या संचारबंदीतून आरोग्‍य, न्‍यायालये, प्रसारमाध्‍यमे आदी अत्‍यावश्‍यक सेवा वगळण्‍यात आल्‍या आहेत.

मणीपूरमधील विद्यार्थी पोलीस महासंचालक, पोलीस उपमहासंचालक आणि राज्‍य सरकारचे सुरक्षा सल्लागार यांना हटवण्‍याच्‍या मागणीसाठी जोरदार आंदोलन करत आहेत.

हे सर्व जण कायदा आणि सुव्‍यवस्‍था हाताळण्‍यास असमर्थ असल्‍याचा विद्यार्थ्‍यांचा आरोप आहे. ९ सप्‍टेंबरला झालेल्‍या आंदोलनाच्‍या वेळी आंदोलन विद्यार्थ्‍यांनी गोळीबार केल्‍याने एक पोलीस कर्मचारी घायाळ झाला होता. १ सप्‍टेंबरपासून झालेल्‍या हिंसक घटनांमध्‍ये ८ जणांचा मृत्‍यू झाला, तर १२ जण घायाळ झाले आहेत.

संपादकीय भूमिका

मणीपूरमध्‍ये जोपर्यंत ख्रिस्‍ती कुकी आतंकवाद्यांना धडा शिकवला जात नाही, तोपर्यंत तेथे शांतता नांदणार नाही !