मुलुंड (मुंबई) येथे श्री गणेशचतुर्थीला जाणीवपूर्वक एका गाडीवर आक्रमण !
एकाचा मृत्यू
मुलुंड – येथे एका गाडीवर गणपतीच्या आगमनाची सिद्धता करीत असतांना दोघांना कारने जाणीवपूर्वक धडक दिल्याचा प्रकार ७ सप्टेंबरला घडला होता.
मुलुंडमधील गव्हाणपाडा येथील मुलुंडचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते सिद्धता करत असतांना बी.एम्.डब्ल्यू. गाडी कॅम्पस हॉटेलकडून प्रचंड वेगाने आली आणि त्यांना धडकली. त्या वेळी एक जण त्या गाडीसमवेत फरफटत पुढे गेला. गाडी त्या चालकाने वळवून परत पाठीमागे आणली आणि कार्यकर्त्यांच्या गाडीवर मुद्दामहून जोरात आदळवली. त्यामुळे त्यांच्या गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे तुटला इतकेच नाही, तर ती गाडी जोरात मागे ढकलली गेल्याने मागे उभे असलेले अन्य लोक आणि दुचाकी सर्व काही एकमेकांवर आदळत त्या गाडीखाली गेले.
यात अनेक लोक घायाळ झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. आरोपीला अटक केली आहे. रुग्णालयात एकाला मृत घोषित करण्यात आले. पहाटे आरोपीने अपघाताचे वृत्त घरी पाहिले. त्यानंतर तो बी.एम्.डब्ल्यू. गाडी झाकून ठेवली आणि तो खारघर येथे गेला.