पिंपरी येथे महापालिकेच्या वतीने घाटांवर कृत्रिम हौद सामाजिक संस्थाकडून धर्मद्रोही मूर्तीदान उपक्रम !
पिंपरी (जिल्हा पुणे) – चिंचवड येथील मोरया घाट, केशवनगर घाट, निगडी आणि आकुर्डी प्राधिकरणातील भाविकांनी गणेश तलावात, तर रावेत येथील भाविकांनी बास्केट पुलाजवळील घाटावर असलेल्या मूर्तीदान केंद्रावर मूर्तीदान केले. दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती. महापालिकेच्या वतीने घाटांवर कृत्रिम हौदही बांधण्यात आले आहेत. भाविकांनी श्री गणेशमूर्ती विसर्जन हौदाचा वापर केला, तसेच घाटांवर सामाजिक संस्थाकडून मूर्तीदान उपक्रमही घेण्यात आला. महापालिकेकडून विसर्जन घाटांवर मदत केंद्र आणि मूर्ती संकलन मंडप उभारण्यात आले आहेत. तेथे अग्नीशमनदलाचे सैनिकही तैनात करण्यात आले आहेत. दीड दिवसाच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी काही भाविकांकडून मूर्तीदान करण्यात आले. (दान केलेल्या मूर्ती खाणीत टाकल्या जातात, रस्ता बुजवण्यासाठी मूर्तीचा वापर केला जातो, असे विविध घटनांमधून लक्षात आले आहे. त्यामुळे मूर्तीदानाऐवजी ती वहात्या पाण्यात विसर्जित करणेच आवश्यक ! – संपादक