अमेरिकेचा ‘जोशुआ प्रकल्प (प्रोजेक्ट)’ भारतियांना ख्रिस्ती बनवत आहे !
नवी देहली – भारतात हिंदूंना आणि विशेषतः आदिवासी समूहांना ख्रिस्ती बनवण्याचे काम फार पूर्वीपासून चालू आहे. यासाठी ख्रिस्ती मिशनरी नैतिक आणि अनैतिक अशा दोन्ही पद्धतींचा अवलंब करत आहेत. ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी िवदेशातूनही निधी येत आहे. ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचा प्रयत्न करणार्यांचे सर्वांत मोठे लक्ष्य गरीब आणि मागासलेले हिंदू आहेत. ज्या भागात आजही सामान्य सुविधा पोचलेल्या नाहीत, त्या भागातही ख्रिस्त्यांनी पाय पसरले आहेत. कुठे चांगल्या उपचाराच्या नावाखाली, तर कुठे शिक्षणाच्या नावाखाली लोकांना हिंदु धर्म सोडून ख्रिस्ती बनवण्यासाठी फसवणूक केली जात आहे. ‘जोशुआ प्रोजेक्ट’ भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्यासाठी मोठी भूमिका बजावत आहे. अमेरिका चालवणारी ही संघटना ‘डेटा’ (माहिती) गोळा करून भारतातील जाती, जमाती आणि इतर गट यांना ख्रिस्ती बनवण्याचा प्रयत्न करत आहे. ‘जोशुआ प्रकल्प’ केवळ भारतातच नाही, तर उर्वरित जगातही कार्यरत आहे. त्याचे लक्ष्य बहुतेक ते देश आहेत, जेथे ख्रिस्ती धर्म अद्याप मोठ्या प्रमाणावर पसरलेला नाही.
‘जोशुआ प्रकल्प’ कसा काम करतो?
‘जोशुआ प्रकल्पा’ने भारतातील विविध जाती आणि आदिवासी गटांची माहिती गोळा केली आहे. या प्रकल्पामध्ये देशातील २ सहस्र २७२ जाती आणि जमाती यांची माहिती गोळा केली आहे. ‘जोशुआ प्रकल्प’ काही स्तरांवर त्याचे काम मोजतो.
‘जोशुआ प्रकल्पा’विषयी दैनिक ‘भास्कर’ने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तात म्हटले आहे, ‘हे मिशन देशभरातील प्रत्येक जात समूहाला ख्रिस्ती धर्मात रूपांतरित करण्यासाठी दलालांची (एजंटची) नियुक्ती करत आहे. धर्मांतरासह हे दलाल ठिकठिकाणी नवनवीन चर्च उभारण्याचे काम करत आहेत. दैनिक ‘भास्कर’लाही असाच एक दलाल सापडला आहे. अहवालात असे म्हटले आहे की, ‘प्रोजेक्ट जोशुआ’ या दलालांना व्यापक प्रशिक्षणानंतर भूमीवर आणतो. एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाऊन माहिती गोळा करणे, हे त्यांचे मुख्य काम आहे. त्याला ‘जोशुआ प्रकल्पा’मधून अनुमाने २ सहस्र रुपयांचे वेतन मिळते.’
‘जोशुआ प्रकल्प’ काय सांगतो ?
‘जोशुआ प्रकल्पा’च्या संकेतस्थळानुसार त्यांना भारतातील २ सहस्र २७२ जाती आणि जमाती यांना ख्रिस्ती धर्मात घेऊन जायचे आहे. या जातींपैकी २ सहस्र ४१ जातींपर्यंत तो अद्याप पोचलेला नाही. यासह १०३ जातींमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रभाव पाडण्यात यश आले आहे. यांपैकी अल्पसंख्येने लोक ख्रिस्ती धर्मावर विश्वास ठेवू लागले आहेत. १२८ जाती समूह अशा आहेत, ज्यात ख्रिस्ती धर्माचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला आहे. प्रकल्पाच्या संकेतस्थळाने म्हटले आहे की, ते आतापर्यंत १४० कोटी लोकसंख्येपैकी ६ कोटी लोकांपर्यंत पोचले आहेत. संकेतस्थळाच्या माहितीनुसार भारतात ‘इव्हॅन्जेलिकल ख्रिश्चॅनिटी’ (ख्रिश्चन धर्माची एक शाखा जी जोशुआ प्रकल्प पसरवत आहे) वाढीचा दर प्रतिवर्षी ३.९ टक्के आहे. ‘जोशुआ प्रकल्प’ केवळ हिंदूंचीच नाही, तर भारतातील शीख आणि मुसलमान, तसेच बौद्ध यांचीही माहिती गोळा करत आहे. ही आकडेवारी त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावरही ठेवली आहे.
मोठ्या संख्येने जातींचे धर्मांतर
‘जोशुआ प्रकल्पा’तील माहिती हे दर्शवते की, यामुळे अनेक जातींमध्ये १० टक्के धर्मांतर झाले आहे. ज्या जातींनी मोठ्या संख्येने ख्रिस्ती धर्म स्वीकारला, त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. तेलंगाणातील माडिगा आणि माला समुदायातील २१ सहस्र लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि त्यांना ‘आदि िख्रस्ती’ असे नाव देण्यात आले आहे. बोडो समाजाच्या १५ लाख ७ सहस्र लोकसंख्येपैकी अनुमाने दीड लाख लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. ‘जोशुआ प्रकल्पा’चे एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्य चालू आहे की, त्यामुळे अनेकांना धर्मांतरासाठी प्रलोभने मिळत आहेत. अनेक वेळा असे ख्रिस्ती धर्मोपदेशक पकडले गेले आहेत की, जे लोकांना ख्रिस्ती धर्मात येण्यास प्रवृत्त करत होते. मध्यप्रदेशात नुकतेच असेच एक प्रकरण उघडकीस आले होते, जिथे ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या लोकांची हत्या करण्यात आली होती.
जोशुआ प्रकल्प म्हणजे काय?‘जोशुआ प्रकल्प’ हे ख्रिस्ती धर्मावर विश्वास न ठेवणार्यांना ख्रिस्ती बनवण्याचे एक ध्येय असलेला प्रकल्प आहे. ही संस्था अमेरिकेतून काम करते. वर्ष १९९५ मध्ये तिची स्थापना झाली. ४ जणांनी मिळून तिची स्थापना केली होती. या ४ व्यक्तींमध्ये एक भारतीय होता. ‘जोशुआ प्रकल्पा’च्या संकेतस्थळावर म्हटले आहे की, ती बायबलमध्ये दिलेल्या सूचनेवर चालते. बायबलमध्ये म्हटले आहे, ‘त्याला जगातील विविध भागांमध्ये लोकांना ख्रिस्ती धर्मात रूपांतरित करण्याचा आणि ‘बाप्तिस्मा’ देण्याचा आदेश प्राप्त झाला आहे, ज्यावर तो कार्य करत आहे.’ ‘जोशुआ प्रकल्पा’चे मुख्य कार्य, म्हणजे ज्या गटांवर अद्याप ख्रिस्ती धर्माचा प्रभाव पडलेला नाही, त्यांच्याकडील माहिती गोळा करणे. ‘जोशुआ प्रकल्पा’ला पैसे कुठून मिळतात, हे स्पष्ट नाही. या प्रकल्पाने ख्रिस्ती धर्मापासून दूर असलेल्या गटांसाठी एक नकाशा बनवला आहे. जगाच्या नकाशावर एक क्षेत्रही काढले गेले आहे, जे ख्रिस्ती धर्मापासून सर्वांत दूर आहे. ‘जोशुआ प्रकल्पा’ने याला ‘१०:४० विंडो’ असे नाव दिले आहे. यामध्ये भारत, चीन, सौदी अरेबिया आणि म्यानमार या देशांचा समावेश आहे. ‘जोशुआ प्रकल्प’ म्हणतो, ‘हे ४ देश ख्रिस्ती धर्माला विरोध करत आहेत. त्यामुळे पहिली आवश्यकता त्यांच्यामध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्याची आहे.’ |
संपादकीय भूमिका
|