‘गौरींची सेवा, म्हणजे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची सेवा आहे’, असा भाव ठेवून सेवा केल्यावर आलेल्या अनुभूती
‘आमच्याकडे प्रतिवर्षी गौरी स्थापित करतात. वर्ष २०२३ मध्ये ‘गौरी म्हणजे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आमच्याकडे येणार आहेत’, असा भाव ठेवून मी गौरींची सेवा केली. तेव्हा मला आलेल्या अनुभूती दिल्या आहेत.
(भाद्रपद शुक्ल सप्तमी ते नवमी या काळात ‘ज्येष्ठा गौरी व्रत’ करतात. – संकलक)
अ. सेवा करतांना मला आनंद मिळाला.
आ. २२.९.२०२३ या दिवशी आमच्या घरी महाआरती होत असतांना माझा भाव जागृत होत होता. ‘आम्ही साक्षात् श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची पूजा करत आहोत’, असे मला जाणवले.
इ. मी गौरींच्या समोर प्रसादाचे पान आणि पेला भरून पाणी ठेवले होते. ‘काही वेळाने पेल्यातील पाणी अर्धे झाले आहे’, असे मला दिसले. तेव्हा माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.
ई. २३.९.२०२३ या दिवशी सकाळी उठल्यावर गौरींसमोर बसून नामजप करत असतांना ‘मोठ्या गौरीचा श्वास चालू आहे’, असे मला २ वेळा जाणवले.
गुरूंच्या कृपेने मला या अनुभूती आल्या, त्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. सोनल करोडदेव, यवतमाळ (२०.१०.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |