खंडोबा हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांचे दैवत !
|
पुणे – देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांचे दैवत म्हणजे खंडोबा ! जेजुरी गडावर आल्यामुळे आज खर्या अर्थाने माझे देवदर्शन झाले आहे. समाजजागृतीचे हे श्रद्धाकेंद्र असून धर्म याच श्रद्धेमुळे टिकला आहे. भौतिक जगातील वैभवासहच आध्यात्मिकतेतील प्रविणता सांगणारा आपला धर्म आहे. जेजुरी गडाच्या परिसरात परकीय आक्रमक स्वस्थपणे झोपू शकला नाही. धर्म ज्या श्रद्धेमुळे आहे त्याची जागृती करणारे हे ठिकाण आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
प.पू. सरसंघचालकांनी ५ सप्टेंबर या दिवशी जेजुरी येथील श्री मार्तंड देव संस्थानला भेट देत श्री खंडोबाचे दर्शन घेतले, त्या वेळी ते बोलत होते. देव संस्थान आणि जेजुरी ग्रामस्थांच्या वतीने सरसंघचालकांना मानपत्र प्रदान करण्यात आले.
समरसतेच्या कामासाठी मानपत्र !देव, देश आणि धर्म टिकावा म्हणून मंदिर, पाणी अन् स्मशान या विषयांवर समरसतेचे वातावरण सिद्ध करण्यासाठी देशभर अग्रेसर म्हणून कार्य करत असल्यामुळे हे मानपत्र प्रदान करण्यात आल्याचे देव संस्थानने म्हटले आहे. श्री खंडेरायाची पगडी, घोंगडे आणि भारतमातेच्या प्रतिमेने सरसंघचालकांचे स्वागत करण्यात आले. |