७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणार्याला २० वर्षे सक्तमजुरी !
पुणे – बांधकाम प्रकल्पावर ७ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या अशोक डोंगोरे या सेवानिवृत्त सरकारी कर्मचार्याला विशेष न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि १० सहस्र रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. मुलगी आपल्या आजोबांसह बागेत खेळायला जायची. तेथे आरोपी आपल्या श्वानाला घेऊन यायचा. त्याने घटनेच्या दिवशी मुलीला एका इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिने आईला घडलेला प्रकार सांगितल्यावर या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केली होती. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात आरोपपत्र प्रविष्ट केले होते. विशेष सरकारी अधिवक्ता म्हणून नितीन कोंघे यांनी काम पाहिले.