पुणे येथील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची मूर्ती १०० टक्के पर्यावरणपूरक !
शिल्पकार अभिजित यांची भावना
पुणे – येथील ग्रामदैवत कसबा गणपति २ वर्षांपासून संपूर्णपणे पर्यावरणपूरक मिश्रणाने सिद्ध होत आहे. यंदाही कसबा गणपतीची मूर्ती ही याच मिश्रणाने साकारली असून, ती १०० टक्के पर्यावरणपूरक आहे. त्यात गाळाची माती, शाडूची माती आणि भाताचे तूस यांचा समावेश आहे. या मिश्रणाला पेटंटही (स्वामित्व हक्कही) मिळालेले आहे. या मिश्रणाने कसबा गणपतीची मूर्ती सिद्ध करायला मिळणे, हे भाग्यच आहे अशी माहिती प्रसिद्ध शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी दिली. या पेटंटला धोंडफळे यांचे वडील रवींद्र यांचे नाव दिले आहे. याच मिश्रणाने पंढरपूर देवस्थानला विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती सिद्ध करून दिली आहे.