पवित्र इंद्रायणी, चंद्रभागा आणि गोदावरी या नद्या प्रदूषणमुक्त करू !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आळंदी (पुणे) – इंद्रायणी, चंद्रभागा आणि गोदावरी या नद्यांच्या प्रदूषणमुक्तीचे आराखडे सिद्ध केले जात आहेत. नदी प्रदूषण मुक्तीचे काम लवकरच चालू होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते आळंदी ‘फ्रूटवाले धर्मशाळा’ येथे झालेल्या ‘मारोती महाराज कुरेकर’ यांच्या ९३ व्या आणि ‘रामराव महाराज ढोक’ यांच्या ७० व्या अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘वारकरी संप्रदाय हा संपूर्ण जीवन अर्पण करणारा, राज्याला, देशाला समाजप्रबोधनाची दिशा देणारा आहे. संत परंपरा, वारकरी पंथ हे महाराष्ट्राचे वैभव आहे. राजकीय अधिष्ठानापेक्षा वारकरी पंथाचे आध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठान मोठे असते. राज्यशासनाचे बंद पडलेले प्रकल्प कार्यान्वित केले. महाराष्ट्र उद्योग, परदेशी गुंतवणूक यांमध्ये आघाडीचे राज्य आहे. देशातील एकूण गुंतवणुकीपैकी ५२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे.’’