भिलाई (छत्तीसगड) येथे मशिदीचेे अवैध बांधकाम महापालिकेने बुलडोझरने हटवले !
तत्कालीन सरकारने दिलेल्या नियोजित भूमिपेक्षा अधिक जागेवर अतिक्रमण
भिलाई (छत्तीसगड) – येथे महापालिकेच्या पथकाने मशिदीचे अवैध अतिक्रमण हटवले. या कारवाईसाठी ८ सप्टेंबर या दिवशी महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोचले. या वेळी पोलिसांचा फौजफाटाही उपस्थित होता. या भूमीचे व्यवस्थापन पहाणार्या करबला समितीला ३ दिवसांपूर्वी महापालिकेने नोटीस पाठवली होती. महापालिकेच्या पथकाने मशिदीची भिंत, ५ दुकाने, एक सभागृह आणि स्वागत प्रवेशद्वार बुलडोझरच्या साहाय्याने पाडले.
१. करबला समितीला वर्ष १९८४ मध्ये भिलाई-रायपूर महामार्गाच्या जवळ मशिदीच्या बांधकामासाठी सुमारे ८०० चौरस फूट भूमी सरकारकडून मिळाल्याचा आरोप आहे. ही भूमी तिला विशेष क्षेत्र विकास प्राधिकरणाने दिली होती; मात्र करबला समितीने या भूमीचा अपवापर करून ८०० चौरस फुटांऐवजी अडीच एकर भूमीवर अतिक्रमण केले होते. (मुसलमान कशा प्रकारे भूमी बळकावतात, याचे हे उदाहरण ! – संपादक)
२. मशिदीच्या नावावर समितीने सभागृह आणि ५ दुकाने बांधली. यासह सैलानी बाबाच्या नावाने समाधीही बांधली. या सर्वांवर महापालिकेचा बुलडोझर धावला.
३. करबला समितीने महापालिकेच्या कारवाईला विरोध करत ही भूमी वर्ष १९५७ पासून तिच्या नियंत्रणात असल्याचा दावा केला.
४. या प्रकरणी भाजपचे नेते एस्.के. मोबीन उर्फ बाबर यांनी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. ‘सैलानी बाबाच्या समाधीला लागून असलेल्या सुपेला-भिलाई मार्गावरील भूमी समितीच्या लोकांनी अवैधरित्या कह्यात घेतली आहे’, असे बाबर यांनी म्हटले आहे.
५. ‘करबला समितीचे अध्यक्ष गुलाम सैलानी यांनी दर्ग्याच्या नावाखाली करोडो रुपयांची भूमी कह्यात घेऊन तेथे दुकाने बांधली आणि ती भाड्याने देऊन मोठ्या प्रमाणात भाडे वसूल केले’, असे बाबर यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकामुसलमानांचा लँड जिहाद ! वास्तविक असे बांधकाम होत असतांना प्रशासन काय करत होते ? मुसलमान लँड जिहाद करण्यास धजावणार नाही, असा वचक प्रशासन कधी निर्माण करणार ? |