Maulana Raped Hindu Women : मदरशातील मौलानाकडून हिंदु महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न
|
(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)
अमरोहा (उत्तरप्रदेश) – स्वतःच्या आजारी मुलासाठी ताईत आणायला एका मदरशात गेलेल्या हिंदु महिलेवर मदरशातील मन्सूर नावाच्या मौलानाने ३ सप्टेंबर या दिवशी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी मन्सूर याला अटक केली आहे.
येथील जलालनगर परिसरात असलेल्या या मदरशात मौलाना मन्सूर हा विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करतो. तो लोकांमध्ये भूतबाधेच्या नावाखाली अंधश्रद्धाही पसरवत होता. पीडित महिला स्वतःच्या मुलाला ताईत आणण्यासाठी मदरशात गेली असता मौलानाने पीडितेला तिच्या मुलाला भूतबाधा झाली असल्याचे सांगितले. महिलेने उपचारांविषयी विचारले असता मौलानाने तिला ७ प्रकारची मिठाई, तसेच लवंग आणि जायफळ आणण्यास सांगितले. पीडितेने या सर्व गोष्टी आणून दिल्यावर मौलानाने तिला कपडे काढून नग्न अवस्थेत खाटेवर झोपण्यास सांगितले. तेव्हा पीडितेला संशय आला. महिलेने कपडे काढण्यास नकार दिल्याने मौलाना संतापला. त्याने पीडितेला शिवीगाळ करत तिला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेने तत्परतेने ११२ या पोलीस साहाय्यता क्रमांकावर संपर्क केला. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी मौलानाला अटक केली.
संपादकीय भूमिकाबहुतांश मदरसे हे गुन्हेगारी, अश्लीलता, वासनांधता, गुंडगिरी, आतंकवाद आदी कुकृत्यांचे अड्डे बनले असल्याने आणखी किती घटना घडल्यावर सरकार अशा मदरशांवर बंदी घालणार आहे ? |