SP Leader raped female lawyer : महिला अधिवक्त्यावर बलात्कार करणार्या समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट
पोलिसांकडून तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ
मऊ (उत्तरप्रदेश) – येथील समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) माजी प्रदेश सचिव आणि मऊ बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष वीरेंद्र बहादुर पाल(Virender Bahadur Pal ) यांच्या विरोधात बलात्काराच्या (rape) प्रकरणी तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. महिला अधिवक्त्याने केलेल्या तक्रारीनुसार पाल यांनी त्यांना मद्य पाजून त्यांच्यावर बलात्कार केला. या घटनेचा त्यांनी व्हिडिओ बनवला आणि धमकावून वारंवार बलात्कार केला. या प्रकरणी महिला अधिवक्त्या तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे दाद मागितल्यावर पोलिसांनी कारवाई झाली. तक्रार नोंदवल्यानंतर वीरेंद्र बहादूर पाल पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
बलात्कार्यांचा अड्डा बनलेला समाजवादी पक्ष !१. अयोध्या येथील पुरा कलंदर भागात मोईद खान याने एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. २. कनौज येथे समाजवादी पक्षाचा नेता नवाबसिंह यादव याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. |
संपादकीय भूमिका
|