Bangladesh : बांगलादेशात कथित ईश्वरनिंदेच्या आरोपावरून हिंदु विद्यार्थ्याची विद्यापिठातून हकालपट्टी
ढाका (बांगलादेश) – काही दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यातच पोलीस आणि सैनिक यांच्यासमोर ईश्वरनिंदेचा आरोप करून उत्सव मंडल (वय १८ वर्षे) या विद्यार्थ्याला मुसलमानांनी अमानुष मारहाण करून त्याचे डोळे काढले होते. हे प्रकरण ताजे असतांना आणखी एक प्रकरण समोर आले आहे. बांगलादेशातील जेसोर विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापिठाच्या बायोमेडिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थी आणि ‘सनातन विद्यार्थी संसदे’चा अध्यक्ष कंकन विश्वास याच्यावर मुसलमान विद्यार्थ्यांनी इस्लामचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. यानंतर विद्यापिठाच्या व्यवस्थापनाने कंकन विश्वास याची विद्यापिठातून हकालपट्टी केली आहे.
मुसलमान विद्यार्थ्यांची निदर्शने
मुसलमान विद्यार्थ्यांनी ७ सप्टेंबर या दिवशी कंकन विश्वास याच्या विरोधात कारवाई करावी आणि त्याची हकालपट्टी करावी, यासाठी निदर्शने करून विद्यापीठ प्रशासनावर दबाव आणला. त्यांनी विद्यापिठाच्या कुलसचिवांकडे निवेदनही सादर केले. मुसलमान विद्यार्थ्यांनी म्हटले की, कंकन विश्वास याला त्याच्या कट्टर हिंदुत्वासाठी शिक्षा करणे आवश्यक आहे. तो इस्लामच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्ये करतो. विश्वास याने सामाजिक माध्यमांवर इस्लामच्या विरोधात विचार प्रसारित केल्याचा मुसलमान विद्यार्थ्यांचा आरोप आहे.
संपादकीय भूमिकापाकिस्तान किंवा बांगलादेश येथील मुसलमान ईश्वरनिंदा याचा हिंदूंच्या विरोधात शस्त्राप्रमाणे वापर करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे यापूर्वी घडलेल्या घटनांतून दिसून येते. हे लक्षात घेऊन भारत सरकार तेथील रक्षणासाठी काय पावले उचलणार ? |