पाटलीपुत्र येथे भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या !
पाटलीपुत्र (बिहार) – येथे ९ सप्टेंबरच्या उत्तररात्री ३ वाजता भाजपचे स्थानिक नेते श्यामसुंदर उपाख्य मुन्ना शर्मा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ३ जणांनी मंगल तलावाजवळ रस्त्याच्या मधोमध शर्मा यांच्यावर गोळीबार केला आणि त्यांचा भ्रमणभाष घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. सीसीटीव्हीच्या चित्रीकरणात गोळीबाराची घटना चित्रित झाली आहे.
५५ वर्षीय शर्मा हे भाजपच्या पाटणा सिटी चौक परिसराचे मंडळ अध्यक्ष होते. शर्मा रिक्शा शोधत होते. ते रस्त्याच्या कडेला बसलेले असतांना त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले. सकाळी काही लोकांना रस्त्यात त्यांचा मृतदेह पडलेला दिसला, तेव्हा पोलिसांना कळवण्यात आले. पुत्र राहुलने घायाळ अवस्थेत असलेल्या वडिलांना रुग्णालयात उपचारांसाठी नेले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास केला जात आहे.
संपादकीय भूमिकाराज्यात भाजपची सत्ता असतांना अशी घटना घडणे अपेक्षित नाही ! |