Trinamool MP Jawhar Sircar quits : तृणमूल काँग्रेसचे नेते जवाहर सरकार यांचे खासदारकीचे त्यागपत्र
कोलकातातील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी ममता बॅनर्जी निष्क्रीय राहिल्याचा आरोप
कोलकाता – तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार जवाहर सरकार यांनी ८ सप्टेंबरला खासदारकीचे त्यागपत्र दिले. कोलकाता येथील आर्.जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेनंतर ममता बॅनर्जी सरकारच्या वृत्तीचा निषेध म्हणून त्यांनी हे त्यागपत्र दिले आहे. सरकार यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लिहिलेल्या पत्रात पक्षातील काही लोकांचा भ्रष्टाचार आणि गुंडगिरी, यांविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रदीर्घ विचारमंथनानंतर खासदारपदाचे त्यागपत्र देण्याचा आणि राजकारणापासून पूर्णपणे दूर रहाण्याचा निर्णय घेत असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. यासह सरकार यांनी राज्यातील भ्रष्टाचार आणि अवैध संपत्ती मिळवणार्या अधिकार्यांविषयीही प्रश्न उपस्थित केले.
शिक्षणमंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या प्रकरणी ममता गप्प !
जवाहर सरकार यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, वर्ष २०२२ मध्ये शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे समोर आले, तेव्हा ममता यांनी सक्रीय व्हायला हवे, असे मी तेव्हा उघडपणे सांगितले होते. असे असतांनाही पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी मला विरोध केला. ममता बॅनर्जी यांनी भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा चालू ठेवतील, अशी मला अपेक्षा होती. त्यामुळेच मी त्या वेळी त्यागपत्र दिले नाही.
नगरपालिका सदस्य आलिशान कारमधून प्रवास करतात !
जवाहर सरकार पुढे म्हणाले की, बंगालमधील पंचायत आणि नगरपालिकेचे अनेक सदस्य आलिशान कार वापरतात. याउलट मी साध्या सदनिकेत रहातो, तसेच जुनी कार वापरतो.
संपादकीय भूमिका
|