Stone-pelting On Ganpati Pandal : सुरत (गुजरात) येथील गणेशोत्सव मंडपावर धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक : ३३ जणांना अटक
|
सुरत (गुजरात) – येथील सय्यदपुरा भागात ८ सप्टेंबरच्या रात्री उशिरा ६ मुसलमान तरुणांनी गणेशोत्सव मंडपावर दगडफेक केली. या घटनेनंतर सहस्रावधी हिंदूंनी रस्त्यावर उतरून प्रचंड संताप व्यक्त केला. हिंदूंच्या संतापानंतर पोलिसांनी दगडफेक करणार्या सहाही मुसलमान युवकांना अटक केली आहे. याखेरीज दगडफेकीच्या घटनेचे समर्थन करणार्या अन्यही २७ जणांनाही अटक करण्यात आली आहे. तसेच ९ सप्टेंबरच्या दुपारी जेथून दगडफेक करण्यात आली, त्यावर बुलडोझर चालवून ती इमारत पाडण्यात आली आहे.
रात्री सय्यदपुरा या मुसलमानबहुल भागात गणेशोत्सव मंडपावर दगडफेक झाल्यामुळे सहस्रावधी हिंदूंनी त्यास विरोध केला. या वेळी हिंदू-मुसलमान एकमेकांसमोर आले. दोन्ही गटांत हाणामारी झाल्याची, तसेच जाळपोळीच्या घटना झाल्याचेही समजते. रात्री उशिरा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार केला. अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या.
गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी आश्वासन पाळले : सूर्योदयापूर्वीच सर्व ३३ मुसलमानांना अटक !या वेळी निर्माण झालेले तणावाचे वातावरण पहाता रात्री २.३० च्या सुमारास गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी आणि स्थानिक भाजप आमदार कांती बलर यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच त्यांनी या वेळी परिसरातील तणाव अल्प करण्यासाठी स्थानिकांशी चर्चाही केली. ‘शांतता भंग करणार्यांवर कारवाई केली जाईल. सुरतमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न चालू आहेत’, असे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले. त्यानंतर सकाळी ६.३० वाजता त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून सांगितले की, आम्ही दिलेल्या आश्वासनानुसार सूर्य उगवण्याआधीच आरोपींना अटक केली आहे ! |
मूर्ती ठेवलेल्या ढोलाचीही तोडफोड ! – मंडळाच्या संयोजक मनीषाबेन
श्री गणेशमूर्ती ढोलावर ठेवण्यात आली होती. दगडफेकीमुळे हा ढोल तुटला आहे; मात्र सुदैवाने मूर्ती बचावली आहे. आम्ही या भागात अतिशय शांततेने रहातो आणि बंधुभाव जपतो. मुसलमानांच्या मिरवणुका आमच्या परिसरातून जातात, तेव्हा कोणतीही अनुचित घटना घडत नाही. गेल्या वर्षीही जवळच असलेल्या गणेश मंडळावर दगडफेक झाली होती, असे गणेश मंडळाच्या संयोजिका मनीषाबेन यांनी सांगितले.
एक सहस्र पोलीस तैनात !
या घटनेविषयी बोलतांना सुरतचे पोलीस आयुक्त अनुपम गेहलोत म्हणाले की, काही मुलांनी गणेश मंडपावर दगडफेक केली आणि त्यानंतर हाणामारी झाली. पोलिसांनी त्या मुलांना ताबडतोब तेथून दूर नेले. पोलिसांना घटनास्थळी तत्काळ तैनात करण्यात आले. ज्या ठिकाणी आवश्यकता होती, त्या ठिकाणी लाठीमार करण्यात आला आणि अश्रुधुराचा वापरही करण्यात आला. शांतता भंग करणार्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. जवळपास एक सहस्र पोलीस तैनात आहेत. संपूर्ण शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका
|