गणेशोत्सवातील ‘लेझर’ दिव्यामुळे तरुणाच्या डोळ्याला दुखापत !
कोल्हापूर – उंचगाव येथे एका गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत लावलेल्या ‘लेझर’ दिव्यामुळे एका तरुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. मिरवणुकीच्या कालावधीत लेझर दिव्याची किरणे या तरुणाच्या डोळ्यात थेट पडल्याने डोळा लाल होऊन त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. त्याच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात भरती केले असता त्याच्या बुबळाला इजा होऊन अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे नेत्रतज्ञांनी सांगितले. ‘कोल्हापूर शहरात काढलेल्या काही गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकीत ध्वनीक्षेपकाचा आवाज हा मर्यादेपेक्षा अधिक असल्याने लवकरच त्यांच्यावर गुन्हे नोंद केले जातील’, असे पोलिसांनी सांगितले.