राज्यभरात दीड दिवसाच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – येथे चौपाटी आणि कृत्रिम तलावांमध्ये मोठ्या संख्येने दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन पार पडले. यात घरगुती श्री गणेशमूर्तींची संख्या अधिक होती. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र येथेही श्री गणेशमूर्तींचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात झाले.

या वेळी मोठ्या आवाजात गाणी लावणे आणि फटाके आदी गोष्टींचा जोर अल्प होता. बर्‍याच ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याने विसर्जन करतांना भाविकांना अडचण आली नाही.