भुसावळ (जिल्हा जळगाव) येथे बनावट नोटाप्रकरणी मुसलमानांना अटक !
जळगाव, ८ सप्टेंबर (वार्ता.) – भुसावळ शहरात बनावट नोटा विक्रीसाठी घेऊन आलेल्या तिघांना ४ सप्टेंबरला सायंकाळी बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या ५ लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. सय्यद मुशारद अली मुमताज अली (शिवाजीनगर, जळगाव), नदीम खान रहीम खान (शनिवार पेठ, जळगाव), अब्दुल हकीम अब्दुल कादर (रावेर, जिल्हा जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
काहीजण भुसावळ शहरात बनावट नोटा विक्रीसाठी घेऊन येत आहेत, अशी गोपनीय माहिती बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एक पथक बनवून भुसावळ शहरात सापळा रचला. १ लाख रुपयांच्या खर्या नोटांच्या मोबदल्यात ३ लाख रुपयांच्या बनावट नोटा हे मुसलमान देणार होते.
वर्ष २०२३ मध्ये जळगाव जिल्ह्यात घडलेल्या काही घटना
१. फेब्रुवारी २०२३ : कुसुंबा (जिल्हा जळगाव) येथून १ लाख ६८ सहस्र ९०० रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांच्या कह्यात
२. जानेवारी २०२३ : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील शहनाज अमीन भोईटे या महिलेच्या घरातून २१ सहस्र ७०० रुपयांच्या बनावट नोटा प्राप्त
३. जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथील हनिफ अहमद शरीफ देशमुख याच्या घरातून २० सहस्र रुपयांच्या बनावट नोटा, त्यासाठी वापरण्यात येणारा कागद (बाँड पेपर) आणि कार जप्त करण्यात आली. हनिफ हा प्रतिदिन २० ते २५ सहस्र रुपयांच्या बनावट नोटा बनवत होता.
संपादकीय भूमिका :
|