वाहतूककोंडी सोडवण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसाला मद्यपी रिक्शाचालकांकडून मारहाण !

उल्हासनगर (जिल्हा ठाणे) – येथील ‘कॅम्प ३’ भागामध्ये २ रिक्शाचालकांनी वाहतूक पोलिसाला मारहाण करण्याची घटना घडली आहे. मद्यपान करून रिक्शाचालकाने एका युवतीला धडक दिली. या घटनेमुळे आजूबाजूच्या भागात वाहतूककोंडी झाली. महिला आणि रिक्शाचालक यांचा वाद थांबवण्यासाठी वाहतूक पोलीस तेथे गेला. रिक्शाचालक वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालू लागला. वाहतूक पोलीस रिक्शाचालकाला पोलीस ठाण्यात घेऊन जात असतांना २ रिक्शाचालकांनी त्यांना मारहाण केल्याने ते गंभीर घायाळ झाले. या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.