शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकाम कामगारांचे आंदोलन !


सातारा, ८ सप्टेंबर (वार्ता.) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करणार्‍या कामगारांनी ६ सप्टेंबरला ‘काम बंद’ आंदोलन केले. २ महिन्यांचे वेतन न मिळाल्याने कामगारांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन करून निषेध व्यक्त केला. सातारा येथे ४६० कोटी रुपये व्यय करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येत आहे. या महाविद्यालयाचे ६० टक्के काम पूर्ण झाले.