सद्गुरु डॉ. गाडगीळकाका, साधनापथावर चालण्यास आम्हा आशीर्वाद द्यावा ।
‘४.९.२०२४ (भाद्रपद शुक्ल प्रतिपदा) या दिवशी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा ६१ वा वाढदिवस होता. त्यानिमित्त साधकांच्या प्रेरणेमुळे देवाने मला पुढील कविता सुचवली.
सनातनचे कार्य स्थूल अन् सूक्ष्म रूपांत चाले ।
ते पूर्णत्वा नेण्या गुरुदेवांनी(टीप १)
सद्गुरु अन् संत रत्ने निवडली ।। १ ।।
स्थूल कार्यापेक्षा सूक्ष्म कार्य असे अनंत अन् अमर्याद ।
सूक्ष्म कार्यास्तव रत्नपारख्यांनी (टीप २)
केली सद्गुरु काकांची निवड ।। २ ।।
सूक्ष्म अंतःचक्षूंनी सद्गुरु काका प्रत्येक गोष्ट न्याहाळतात ।
तिन्ही काळ अन् सप्तपाताळ पहाण्या
त्यांची दृष्टी असे अमर्याद ।। ३ ।।
कोणासाठी बनती ते सूक्ष्म जडीबुटी,
तर कोणासाठी ‘व्हेंटिलेटर’(टीप ३) ।
प्रत्येक साधकाच्या मनात असे त्यांच्यासाठी श्रद्धेचे एक दालन ।। ४ ।।
मरणोत्तरही साधकाला त्यांच्या रूपाने
नवचैतन्यरूपी संजीवनी लाभते ।
त्यांच्या प्रत्येक कृतीने गुरुदेवांचे सूक्ष्म कार्य पुढे पुढे जाते ।। ५ ।।
‘निर्मळ मन’, ‘अहंशून्यता’ अन् ‘सहजता’
यांसह ते असंख्य गुणांनी नटले ।
सर्वांच्या सूक्ष्म अडचणी दूर करण्या ते तिन्ही
त्रिकाळ पुढे सरसावले ।। ६ ।।
वंदन करतो सदासर्वकाळ अशा सद्गुरुरूपी रत्नाला ।
साधनापथावर चालण्या आम्हा पामरांना आशीर्वाद द्यावा ।। ७ ।।
टीप १ आणि २ : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
टीप ३ : श्वासोच्छ्वास चालू ठेवण्यासाठी साहाय्य करणारे उपकरण
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या चरणी ग्रंथांशी संबंधित सेवा करणार्या सर्व साधकांकडून कृतज्ञतापूर्वक शिरसाष्टांग नमस्कार !’
– श्री. अविनाश जाधव (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.९.२०२४)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |