पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांची अभंगवाणी !
पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती केली असून हे सर्व अभंग त्यांना स्फुरलेले आहेत. या अभंगांचे वैशिष्ट्य, म्हणजे हे अभंग सर्वसामान्य मनुष्याला समजतील असे साधे, सोपे आणि भक्तीचा अविट गोडवा असलेले आहेत. त्यातील काही अभंग प्रसिद्ध करत आहोत.
जे ईश्वरी संकेत असतील ।
ते केव्हाही नाही चुकतील ।। १ ।।
जन्म झाला ठिकपूर्ती गावात ।
प्राथमिक शिक्षण झाले पूर्ण वाळव्यात ।। २ ।।
उच्च शिक्षण घेतले कोल्हापुरात ।
सेवा घडली रामनाथी आश्रमात ।। ३ ।।
कसोटी घडली अथक जीवनात ।
झाली गुरुसेवा दिव्य फलप्राप्त ।। ४ ।।
राजूदादा (टीप) मुक्त झाला नर जन्मात ।
कलियुगाचा एक महान संत ।। ५ ।।
– ह.भ.प. धोंडिबा रक्ताडे (महाराज), वाळवे-बद्रुक, जिल्हा कोल्हापूर. (साभार : ग्रंथ ‘धोंडिबाची अभंगवाणी’, खंड – १)
|