मिरज येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फलकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी नावाचा उल्लेख लगेच पालटला !
अखिल भारतीय मराठा महासंघाची आंदोलनाची चेतावणी !
मिरज – येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या शेजारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्पाद्वारे रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात येत असलेल्या नामनिर्देशक आणि दिशादर्शक फलकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होता. याविषयी अखिल भारतीय मराठा महासंघाने नामफलकावरती ‘छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम’ असा उल्लेख करावा अन्यथा तुमच्या कार्यालयात येऊन आंदोलन करण्याची चेतावणी दिली. त्यानंतर ४ घंट्यात प्राधिकरणाने त्वरित या फलकावर पालट करून ‘छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम’ या नावाचा फलक उभा केला.
या वेळी सांगली जिल्हा उपाध्यक्ष श्री. तानाजी भोसले आणि मिरज शहरप्रमुख श्री. दादासाहेब पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची तत्परतेने नोंद घेऊन नामफलकांमध्ये पालट केल्याविषयी संबंधित विभागाचे आभार मानले.