Giorgia Meloni : रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी भारत आणि चीन भूमिका बजावू शकतात !
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनीही भारताविषयी व्यक्त केला विश्वास !
लंडन (इंग्लंड) – गेल्या अडीच वर्षांपासून रशिया आणि युक्रेन (Russia and Ukraine war)यांच्यात युद्ध चालू आहे. तसे पाहिले, तर युक्रेनच्या खांद्यावर ‘नाटो’(NATO) देशांनी बंदूक ठेवून ते रशियावर शस्त्र उगारत आहेत. अशातच ‘नाटो’चा महत्त्वपूर्ण सदस्य असलेल्या इटलीने हा संघर्ष थांबवण्यासाठी भारताच्या भूमिकेला अधोरेखित केले आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Italian Prime Minister Giorgia Meloni) यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की (Volodymyr Zelensky, President of Ukraine )यांची ७ सप्टेंबरला भेट घेतल्यानंतर म्हटले की, रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी भारत (India) आणि चीन(China) भूमिका बजावू शकतात.
मेलोनी म्हणाल्या की, संघर्षाच्या निराकरणात चीन आणि भारत यांची भूमिका असली पाहिजे, असे माझे म्हणणे आहे. तसेच युक्रेनला एकटे टाकून हा संघर्ष सोडवला जाऊ शकतो, असा विचार करणेच शक्य नाही.
व्लादिमिर पुतिन यांनीही भारताने मध्यस्थी करण्याचे केले होते सुतोवाच !
याआधी ५ सप्टेंबरला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन म्हणाले होते की, रशियाच्या युक्रेनसमवेतच्या संभाव्य शांतता चर्चेत भारत, चीन आणि ब्राझिल मध्यस्थाची भूमिका बजावू शकतात. यासाठी हे देश प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.