Ujjain Rape Case : उज्जैन (मध्यप्रदेश) येथे उघड्यावर होत असलेल्या बलात्काराच्या घटनेचा व्हिडीओ बनवणार्या महंमद सलीम याला अटक
उज्जैन (मध्यप्रदेश) – काही दिवसांपूर्वी येथील एका परिसरात कचरा आणि भंगार वेचणार्या महिलेवर दिवसाढवळ्या पदपथावर बलात्कार करण्यात आला. ही घटना घडत असतांना त्या पदपथावरून ये-जा करणार्या लोकांनीही तिला वाचवले नाही, तर एका व्यक्तीने महिलेला वाचवण्याऐवजी बलात्काराचे चित्रीकरण करून हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला. (बलात्कार होत असतांना त्याविषयी निष्क्रीय रहाणारा समाज नष्ट होण्याच्याच लायकीचा होय ! – संपादक) आता पोलिसांनी चित्रीकरण करणार्याला अटक केली आहे. महंमद सलीम (वय ४२ वर्षे) असे याचे नाव असून तो रिक्शाचालक आहे. (धर्मांधांनी मानसिकता जाणा ! – संपादक) त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.
बलात्कार करणार्या व्यक्तीने त्या पीडित महिलेला लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्या दिवशी त्याने महिलेला दारू पाजली आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी यापूर्वी बलात्कार करणार्याला अटक केली असून त्याचे नाव उघड करण्यात आलेले नाही.
संपादकीय भूमिकादेशात प्रतिदिन लपूनछपून बलात्कार होत होते. आता उघड्यावर आणि दिवसाढवळ्या बलात्कार होत आहे. यावरून समाजाची स्थिती किती वाईट झाली आहे, हे लक्षात येते ! आतातरी सर्वपक्षीय सरकारे, प्रशासन, पोलीस आणि न्यायव्यवस्था जागे होऊन काही करतील का ? |