शोभायात्रा काढतांना त्यात सहभागी महिला आणि मुले यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना हवी !
भारतात अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना आहेत. त्यांच्यात मतभेद असू शकतात; पण याचा लाभ शत्रूने उठवू नये, याकडे लक्ष दिले पाहिजे, तसेच सर्वांनाच हिंदु राष्ट्राची स्थापना हवी आहे. त्यामुळे सर्वांनी संघटित होणे आवश्यक आहे. हिंदूंच्या प्रत्येक देवतेच्या हातात शस्त्रे आहेत. शिखांच्याही कमरेला शस्त्र असते, पोलीस आणि सैन्य यांच्याकडेही शस्त्रे असतात; पण इंग्रजांनी ‘भारतीय शस्त्र अधिनियम १८७८’ लागू करून हिंदूंना नि:शस्त्र केले. तेव्हापासून हिंदूंची स्थिती दयनीय झाली आहे. विविध दंगलींमध्ये धर्मांध हिंदूंवर आधुनिक शस्त्रांसह आक्रमणे करतात. अशा वेळी अनेक हिंदूंना जीव गमवावा लागतो. असे असतांना सण-उत्सवांच्या वेळी हिंदुत्वनिष्ठ शोभायात्रा काढतात; पण त्याच्याकडे हिंदु महिला आणि मुले यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काहीच उपाययोजना नसते. याचाही विचार करणे आवश्यक आहे.
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.