अहिल्यानगर शहरातील मोची गल्ली येथे धर्मांधांकडून हिंदु महिलेला बेदम मारहाण करून केला विनयभंग !
अहिल्यानगर – शहरातील मोची गल्ली येथे ५ सप्टेंबर या दिवशी दुचाकी लावण्याच्या किरकोळ कारणावरून शकूर शेख नावाच्या व्यक्तीने एका हिंदु महिलेला अरेरावीची आणि जातीवाचक भाषा करत शिवीगाळ केली. सदर भांडणाच्या वेळी शकूर याचा मुलगा अजिज शेख महिलेचा व्हिडिओ बनवत होता, तेव्हा त्या महिलेने व्हिडिओ काढण्यास विरोध केला असता अजिज शेख म्हणाला की, ‘मी व्हिडिओ काढणार आणि व्हायरल करून तुझी अपकीर्ती करणार.’ शकूर आणि अजीज यांनी महिलेला मारहाण केली. या वेळी अजिज याने महिलेचा विनयभंग केला. या वेळी शकूर शेख, तसेच त्याचा पुतण्या अकलाक शेख आणि अजिज शेख यांनी महिलेला धमकी दिली की, ‘तुम्हाला कसे बाहेर काढायचे हे आम्हाला चांगले ठाऊक आहे. तू उद्यापासून येथे कशी येते तेच पहातो ? तुझा पत्ता कट करतो.’
त्या खाली पडल्या असता त्यांची आई त्यांना उठवण्यासाठी मध्ये आल्यावर त्यांनाही या दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली, तसेच महिलेच्या मैत्रिणीलाही धमकावले. या प्रकरणी पीडितेच्या पतीने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.
पोलिसांनी शकूर, अजित शेख आणि अकलाक शेख यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना कह्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शकूर याने मोची गल्ली या ठिकाणी त्याची जागा नसतांना रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने लावलेली आहेत. त्यातील काही दुकानदारांकडून तो भाडेही घेतो. धर्माधांची ही मुजोरी मोची गल्लीत वाढत चालली असून स्थानिक हिंदूंना त्या ठिकाणी स्वतःचे दुकान आणि जागा असूनही काही करता येत नाही.
हिंदु महिलेची क्षात्रवृत्ती !
परिसरातील गुंड प्रवृत्तीच्या शकूर, अजीज आणि अकलाक यांच्या दहशतीला न घाबरता निर्भीडपणे स्वतःचा आणि स्वतःच्या आईचा बचाव करणार्या या हिंदु महिलेने स्वसंरक्षणार्थ जेव्हा शकूर याच्या कानशिलात लगावली, तेव्हा उपस्थित अचंबित झाले.
पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून आलेल्या वरील तीनही गुंडांपैकी एकाने पोलीस ठाण्यामध्ये हिंदु महिलेकडे रागाने पहात मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.पोलीस जेव्हा घटनास्थळी पुन्हा महिलेला घेऊन गेले असता उपस्थित जमावापैकी एक धर्मांध माहिती सांगणार्या महिलेचा व्हिडिओ बनवत होता. तेव्हा सतर्कतेने तिने ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात आणून दिल्यावर पोलिसांनी त्या धर्मांधाकडून भ्रमणभाष घेऊन व्हिडिओ पुसून टाकायला लावला.
संपादकीय भूमिका :
|