लेखकांनो, ग्रंथामध्ये संस्कृत श्लोकांसह त्यांचा अर्थही दिल्यास सर्वसामान्य वाचकाला त्यातून बोध मिळेल !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘अनेक मराठी लेखक लिखाण करतांना केवळ संस्कृत श्लोक देऊन पुढे स्वतःचे लिखाण सुरू करतात. सध्याच्या काळात संस्कृत भाषा प्रचलित नसल्यामुळे त्या संस्कृत श्लोकांचा अर्थ सर्वसामान्य वाचकांना कळत नाही. यासाठी लेखकांनो, लिखाणात श्लोकांसह त्यांचा अर्थही दिल्यास वाचकांना त्याचा अधिक लाभ होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले