बांगलादेशींची सीमेवरून सहज घुसखोरी !
बांगलादेशी अन् रोहिंग्या घुसखोर यांच्या समस्येविषयी वारंवार बोलले जाते. ‘बांगलादेशी घुसखोरांची भारतातील संख्या काही कोटींमध्ये गेली आहे’, असे एका अहवालाच्या संदर्भातील बातमीतून लक्षात आले. बांगलादेशी घुसखोर हे भारताच्या सुरक्षेसाठी पुष्कळ मोठा धोका आहेत; कारण अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग आढळून आला आहे. भारतातील काही जिल्ह्यांमध्ये तर बांगलादेशी नागरिकांसाठी नागरिकत्वाचे प्रमाण असणारी आधारकार्ड, शिधापत्रिका इत्यादी सहज मिळवतात. भारताच्या अंतर्गत भागात बांगलादेशींमुळे समस्या असून सीमेवर काय परिस्थिती आहे, तेही लक्षात घेतले पाहिजे.
१. भारतात घुसखोरी कशी करायची ? याचे प्रात्यक्षिक दाखवणारे व्हिडिओ
दिलवर हुसेन नावाच्या बांगलादेशी ‘यू ट्यूबर’ने (‘यू ट्यूब’वर विविध विषयांचे व्हिडिओ अपलोड करणार्यांना ‘यू ट्यूबर’ असे म्हणतात.) ‘भारतात प्रवेश करण्यासाठी पारपत्र लागत नाही, व्हिसा लागत नाही’, असे सांगत ‘बांगलादेश-भारत सीमेवरून भारतात प्रवेश कसा करायचा’, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. दुसरा यू ट्यूबर तहसन रकूब हासुद्धा एका व्हिडिओमध्ये ‘भारताच्या तारांचे कुंपण ओलांडून भारतीय भूभागावर कशी उडी मारायची ? तेथून एक छोटा जंगलाचा रस्ता कसा ओलांडायचा आणि भारतात आधीच एक दुचाकी भाड्याने आरक्षित करून कशा प्रकारे प्रवेश मिळवायचा ?’, याचे प्रात्यक्षिक करून दाखवतो. हे बांगलादेशी काही यू ट्यूबर भारतीय सीमेवरील अशी ठिकाणे दाखवत होते की, तेथे सीमा सुरक्षा दलाचे कुणीही सैनिक उपलब्ध नव्हते. काही मार्ग तर छोटे भुयारी मार्ग वा काही मोठे पाईपलाईन आहेत, ज्यातून सहजतेने रांगत भारतीय सीमेत प्रवेश करता येतो. अशा प्रकारे भारताच्या सीमेला मोठा धोका निर्माण करणारे असे व्हिडिओ यू ट्यूबवर उपलब्ध असून प्रशासनाकडून त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही.
२. सीमावर्ती भागातील काही नागरिकांचे आश्चर्यकारक वागणे !
याच सीमावर्ती भागातील नागरिक भारताची सीमा ओलांडून येत असलेल्या या बांगलादेशी घुसखोरांना पहात आहेत; मात्र ते त्यांना काहीच बोलत नाहीत. यावर सर्वांत आश्चर्यकारक, म्हणजे सीमेवरील एका कुटुंबाने यापैकी काही घुसखोर मुलांनी पाणी आणि थांबण्यासाठी जागा मागितल्यावर गावकरी कुटुंबाने सहज त्यांना राहू दिले. अशाच प्रकारचे आदरातिथ्य भारतावर आक्रमण करण्यासाठी आलेल्या मोगल, अरब आक्रमकांचे तत्कालीन काही भारतियांनी ‘अतिथी देवो भव’ याचा अर्थ समजून न घेता केलेले असू शकते. त्याचा परिणाम नंतर अनेक शतके आपण भोगला आहे. त्याची पुनरावृत्ती होत आहे कि काय ? अशीच शंका येते. एकदा का भारतीय भूमीत प्रवेश केल्यावर हे घुसखोर भारतभर पसरतात. भारतातील बंगालच्या व्यतिरिक्त आसाम, झारखंड, उत्तराखंड आणि महाराष्ट्र येथे मोठ्या प्रमाणात प्रवेश करत आहेत. मुंबईत काही दिवसांपूर्वी २०० हून अधिक खोटे आधारकार्ड फेकलेले आढळले. नवी देहलीच्या शाहीनबाग परिसरातून ये-जा करणार्या मुसलमानांना एक भारतीय यू ट्यूबरने ‘तुम्ही कुठून आला आहात ?’, असे विचारल्यावर जवळपास प्रत्येक जण ‘आम्ही बांगलादेश येथून आलो’, असे सांगत होते. त्यांचा उन्मत्तपणा एवढा वाढला आहे की, ‘तुमच्यावर कारवाई होऊ शकते’, असे एका बांगलादेशीला विचारल्यावर त्याने ‘हे शाहीनबाग आहे, येथे येण्यासाठी धाडस लागते, समजले का ?’, असे उत्तर दिले.
३. भारतात प्रवेशाचे विविध मार्ग
अ. भारतात प्रवेश करण्याचे प्रात्यक्षिक दाखवणारे २ बांगलादेशी हे भारतात मेघालयाच्या मार्गाने आले. मेघालय येथून ते आसाम, त्रिपुरा आणि नागालँड येथे गेले अन् तेथून ते कोलकाता येथे येऊन खोटे आधारकार्ड सिद्ध करून घेऊन उत्तर अथवा दक्षिण भारत येथे जाऊन स्थायिक होतात.
आ. दुसरा मार्ग आहे त्रिपुरा येथून ! या मार्गाने येणे अधिक सोपे आहे; कारण हा मार्ग दाट जंगलाने वेढलेला आहे. त्यामुळे येथून प्रवेश करणे सोपे आहे. नुकत्याच पकडलेल्या काही घुसखोरांकडून समजले की, त्रिपुरा येथे काही दलाल कार्यरत आहेत की, जे केवळ अडीच सहस्र रुपयांत या बांगलादेशींना भारतात प्रवेश मिळवून देतात आणि प्रत्येक आठवड्याला असे बांगलादेशी भारतात येतात.
इ. नेपाळ आणि भारत यांच्या सीमेचे काम करणारी महाकाली नदी आहे. तेथून भारतात प्रवेश करण्यासाठी बांगलादेशींनी नदीवर ‘रोप-वे’ बनवून घेतला आहे, त्याला स्थानिक भाषेत ‘ट्वीन’ म्हणतात. साहसी क्रीडा प्रकार खेळल्याप्रमाणे या दोरीद्वारे सरकत हे बांगलादेशी भारतात येतात. यापेक्षा कहर म्हणजे काही जण भारतात जाणार्या नेपाळच्या बसमधूनही भारतात येतात आणि सीमेवर त्यांची पारपत्रे कुणीही पडताळत नाही.
४. बांगलादेशी घुसखोरांमुळे झारखंडची वाईट स्थिती
झारखंड राज्यातील आदिवासी भागात हे घुसखोर स्थानिक आदिवासी समाजातील महिलांशी लग्न करतात आणि त्यांची भूमी अन् संपत्ती यांवर ताबा मिळवतात. येथील बहुतांश आदिवासी सरपंच महिलांचे पती हे बांगलादेशी घुसखोरच आहेत. जेव्हा या महिला निवडून येतात, तेव्हा त्या भागात त्यांचे पती दादागिरी करतात, तेथील राजकारण स्वत:च्या हातात घेतात. भारतात प्रवासी व्हिसा घेऊन येणार्यांची संख्या अधिक आहे. हे भारतात प्रवासी व्हिसा घेऊन येतात; मात्र भारतातच खोटे आधारकार्ड सिद्ध करून येथेच रहातात. गत ८ महिन्यांत १० लाख बांगलादेशींनी या व्हिसाद्वारे भारतात प्रवेश मिळवला आहे. यातील आता किती परत गेले असतील ? भाजपचे झारखंड राज्य अध्यक्ष बाबूलाल मरांडी यांनी सांगितले, ‘बनावट मतदारांची संख्या २० टक्क्यांहून वाढून ती १२३ टक्के झाली आहे. बांगलादेशी मुसलमान त्यांचे हिंदु नावांचे आधारकार्ड सिद्ध करून ओळख कायमस्वरूपी लपवत आहेत.’
५. बांगलादेशींनी सरकारी योजनेद्वारे घरे मिळवणे
भारतात सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना नोकरी करून २० ते २५ वर्षांनंतर स्वत:चे घर उपलब्ध होते; मात्र काही बांगलादेशींना ‘प्रधानमंत्री अटल आवास योजने’च्या माध्यमातून घरेही उपलब्ध झाली आहेत. हे बांगलादेशी, रोहिंग्या भारतात प्रवेश करून बसस्थानके, मोकळ्या जागा, झोपडपट्टी इत्यादी ठिकाणी बस्तान मांडतात आणि काही वर्षे तेथे राहिल्यानंतर प्रशासनाला त्यांच्या घरांची व्यवस्था करावी लागते. हे किती चीड आणणारे आहे ! उत्तराखंडच्या हल्द्वानी येथे ४ सहस्रांहून अधिक बांगलादेशी, रोहिंग्या अवैधपणे रहात होते; मात्र उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे त्यांचे प्रशासनाला आता पुनर्वसन करावे लागणार आहे. त्यांना घरे बांधून द्यावी लागणार आहेत.
६. गुन्हेगार घुसखोर !
भारताची लोकसंख्या १४० कोटींहून अधिक झाल्याचे म्हटले जाते. बांगलादेशींमुळे लोकसंख्येचे असंतुलन निर्माण होत आहे. हे बांगलादेशी मिळेल त्या वेतनात कोणतेही काम करतात. त्यामुळे स्थानिक लोक स्थानिक कामगारांना काम देण्याऐवजी पैसे वाचवण्याच्या नादात बांगलादेशींना कामावर ठेवतात. प्रारंभी काम करतात; पण नंतर मात्र गुन्हे करतात. अल्पवयीन मुली, महिला यांच्यावरील बलात्कारांच्या प्रकरणात या बांगलादेशी, रोहिंग्या यांचा सहभाग आढळला आहे.
मुख्य म्हणजे भारतात दंगली घडवण्यासाठी, हिंदूंविरुद्ध वातावरण निर्मितीसाठी हे बांगलादेशी मुसलमान स्थानिक मुसलमानांना भडकावतात, म्हणजे भारतात अवैधरित्या यायचे, घुसखोरी करून यायचे, येथील सर्व सुविधा लाटायच्या आणि पुन्हा भारतियांविरुद्ध गुन्हे करायचे, देशविरोधी काम करायचे, असे गुन्हे वाढत जातात. भारत अस्थिर करण्याच्या कामी, लोकसंख्येचे असंतुलन होण्यामागे हे घुसखोर कारणीभूत आहेत. त्यांना शोधून पुन्हा बांगलादेशात पाठवण्याची प्रक्रिया ही पुष्कळ वेळखाऊ आणि जटील आहे. त्यातही अगदी तुरळक लोकांना या प्रक्रियेद्वारे पुन्हा बांगलादेशात पाठवण्यात यश आले, तरी त्यांची भारतात येण्याची संख्या अनेक पटींनी अधिक आहे.
७. …तर जनतेला मोहीम राबवावी लागेल !
भारतात बांगलादेशी सीमेद्वारे घुसू शकतात. यातून सीमावर्ती भागातील, देशांतर्गत सुरक्षाव्यव्यस्था कुचकामी आहे, तसेच येथील जे स्थानिक त्यांना भारतात अवैधपणे घुसण्यास साहाय्य करतात, तेसुद्धा भारताचे शत्रूच आहेत. बांगलादेशींची संख्या भारताच्या काही जिल्ह्यांमध्ये वाढून ते त्यांनी कुणाला निवडून द्यायचे, हेसुद्धा ठरवू शकतात, अशी स्थिती आहे. ‘व्होट बँके’मुळे (मतपेटीमुळे) राजकारणी या समस्यांकडे दुर्लक्ष करत असतील, तर जनेतेचे ते दायित्व बनते की, त्यांनी या समस्येविषयी सामाजिक माध्यमे, प्रत्यक्ष स्वरूपात मोठी मोहीम राबवून बांगलादेशींना शोधून काढणे, पोलिसांना कळवणे, असे प्रयत्न करावे लागतील. स्थानिकांचे रोजगार हिरावणार्या, स्थानिकांसाठी असुरक्षित वातावरण निर्माण करणार्या आणि देशाच्या सुरक्षेसमोर आव्हान ठरणार्या या समस्येविषयी जनजागृती निर्माण करणे, हे प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाचे दायित्व आहे.
श्री गुरुचरणार्पणमस्तु ।
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (४.९.२०२४)
संपादकीय भूमिकादेशातील नागरिकांसाठी असुरक्षित वातावरण निर्माण करणार्या अन् देशाच्या सुरक्षेसमोर आव्हान ठरणार्या घुसखोरांना हुसकावून लावा ! |