आमचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे २ सहस्र रुपये देणार ! – मल्लिकार्जुन खर्गे, अध्यक्ष, काँग्रेस
सांगली – आमचे सरकार निवडून आल्यास लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला २ सहस्र रुपये देण्यात येतील, असे आश्वासन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी येथे दिले. सांगली येथील राहुल गांधी यांच्या सभेत ते पुढे म्हणाले की, खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी काँग्रेसही आमच्यासमवेत आहे. त्यांच्या बाजूने जे आहेत, ते सर्व नकली आहेत. मोदी सरकार केवळ तोडण्याच्या अन् फोडण्याच्याच गोष्टी करते. त्या पलीकडे जाऊन त्यांनी काही केले आहे का ? (काँग्रेसने काय केले तेही जगजाहीर आहे. – संपादक)