नागोठणे ते लोणेरे प्रचंड वाहतूककोंडी
नागोठणे – मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे ते लोणेरे या दरम्यान ४० कि.मी. अंतरावर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. मुंबईहून रात्री १० वाजता निघालेल्या गाड्या दुपार झाली तरी अडकून पडल्या होत्या. राज्य परिवहन मंडळाच्या अनेक बसगाड्या, खासगी गाड्या येथे २० घंटे अडकून पडल्याने लहान मुले आणि महिला यांचे हाल झाले. त्यामुळे ‘आम्ही गावाला कधी पोचणार आणि गणेशमूर्तीची स्थापना कधी करणार ?’ असा प्रश्न प्रवाशांना पडला होता.