२१ गणेश क्षेत्रे !
महाराष्ट्रात ‘अष्टविनायक’ ही गणेश क्षेत्रांची गणना लोकप्रिय असली, तरी पुराणात २१ गणेश क्षेत्रे सांगितली आहेत. महाराष्ट्रातील आठही स्थाने त्यात समाविष्ट आहेतच; परंतु २१ क्षेत्रांतील अष्टविनायकांपैकी आणखी काही स्थाने महाराष्ट्रातच आहेत आणि काही महाराष्ट्राबाहेर भारतात अन्य ठिकाणी आहेत. तथापि गणेश क्षेत्रे म्हणून २१ क्षेत्रांनाच महत्त्व आहे.
ही अष्टविनायकांची महाराष्ट्रातील स्थाने आहेत. आणखी ५ स्थाने मिळून १३ स्थाने महाराष्ट्रातच आहेत. या व्यतिरिक्त भक्तांच्या गणेश माहात्म्यामुळे चिंचवड, गणपतीपुळे अशी महत्त्व पावलेली आणखीही क्षेत्रे महाराष्ट्रात आहेत. (साभार : ‘आनंदी ज्योतिष’)