पहिले नमन गणरायाला !
‘कोणत्याही शुभकार्याला प्रारंभ करतांना आपण ‘श्री गणेशाय नमः।’ असे गणपतीचे स्मरण करतो. एकदा स्वर्गातील देवदेवता आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी ब्रह्मदेवाच्या म्हणण्यानुसार पृथ्वी प्रदक्षिणेची स्पर्धा करण्यास निघाले. गणपतीने आपल्या युक्तीचातुर्याने शास्त्राप्रमाणे आपले माता-पिता यांना ७ प्रदक्षिणा घालून सर्वप्रथम पृथ्वी प्रदक्षिणा केली आणि अग्रपूजेचा मान मिळवला. तेव्हापासून पहिली पूजा ही गणपतीची केली जाते. पहिला नमस्कारही गणपतीलाच करतात.’ – (साभार : मासिक ‘सदाचार आणि संस्कृति’, सप्टेंबर २०१४)