शक्तीरूपी संवेदना !
‘श्री गणेशाचे कार्य शिवापासून आरंभ होते, म्हणजे ते शिवतत्त्वाशी संबंधित आहे. शिव म्हणजे शांती. श्री गणेश म्हणजे निवृत्ती प्रदान करणारी, आत्मशांतीला गती देणारी शक्तीरूप संवेदना, जी ज्ञानब्रह्म, शब्द-निःशब्द ब्रह्म, ब्रह्मस्वरूप आहे. ती शांती, काल, दिशा आणि निरामय अशा मार्गांनी नेणार्या परमात्म्याची धारणा आहे. ती साकारस्वरूप द्वैतातून निर्गुणत्वाकडे नेते.’ – श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.