यवतमाळ येथील ‘कमलेश्वर मंदिर मित्रपरिवार, लोहारा’चा स्तुत्य उपक्रम !

यवतमाळ, २ सप्टेंबर (वार्ता.) – लोहारा येथील कमलेश्वर मंदिर मित्रपरिवाराच्या वतीने श्रावण मासानिमित्ताने शिवभक्तांसाठी प्रतिसोमवारी सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत विनामूल्य चहा आणि पाणी देण्याची सेवा करण्याचा उपक्रम घेण्यात आला. याचा लाभ सहस्रो शिवभक्तांनी घेतला.
या उपक्रमासाठी लोहारा मित्र परिवाराचे सर्वश्री गोपाल गावंडे, किशोर खताडे, शिवा डोईजड, संतोष नागोसे, दिनेश येवले, गोपाल निरटकर, निकेश आखरे यांनी परिश्रम घेतले.