हिंदूंचे शेवटचे काही श्वास…!
हिंदूंवर होणार्या अत्याचारांविषयी आपण सतत ऐकत असतो. बांगलादेशातील हिंदूंवर झालेले अत्याचार तर आपल्याला बघायलाही मिळाले; पण त्यामुळे आपल्यात काय फरक पडला ? कसा पडेल ? आपल्याला तर अत्याचार करून घेण्याची सवयच आहे. सहस्रो वर्षे आपल्यावर अत्याचारच होत आले आहेत.
१. स्वातंत्र्यपूर्वीपासून भारतात मुसलमानांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचाराचा इतिहास
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
वर्ष १९४६ मध्ये नौखालीत काय झाले ? एकेका गावात शिरून पुरुषांना ठार करण्यात आले, जिवंत जाळण्यात आले. नुसता जीव नाही घेतला, तर त्यांना मारण्याआधी त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या बायका-मुलींवर अत्याचार करण्यात आले आणि त्या आक्रमणकर्त्यांसह अनेक मौलवीही (इस्लामचे धार्मिक नेते) होते, उगाच वेळ नको दवडायला तिथल्या तिथे निकाह ! त्या आधी वर्ष १९२१ मध्ये मलबारमध्ये (केरळ) काय झाले ? असेच तर अत्याचार झाले हिंदूंवर ! मृत, अर्धमृत शरिरांनी विहिरी आणि तलाव भरले होते ! त्याखेरीज गर्भवती स्त्रियांवर बलात्कार केल्यानंतर त्यांची पोटे फाडून गर्भ बाहेर काढले गेले ! काश्मीर पंडितांचे काय वेगळे झाले ? पण इथे कुणालाच याचे भान नाही.
२. सध्याच्या तरुण-तरुणींची सद्यःस्थिती आणि निधर्मीपणा !
‘अहो, जाऊ द्या ना. उगाच का तोच तोच इतिहास उगाळत आहात ? आणि आम्ही पाहिला की, ‘द कश्मीर फाइल्स’, ‘केरळ फाइल्स’, अमक्या फाइल्स, तमक्या फाइल्स… काय काय लक्षात ठेवायचे आम्ही ? अन् ‘ते माझ्या दारात तर घडले नाही ना ? मग मला काय त्याचे ?’ आणि आता आमचे आता सणासुदीचे दिवस आहेत ! आताच तर दहीहंडीचा उत्सव झाला. प्रचंड संख्येने आजचा तरुणवर्ग ‘डीजे’ ध्वनीक्षेपकाच्या आणि कुणाकुणाच्या तालावर थिरकतांना पाहिला अन् मनात आले, ‘कित्येकांचे हा देशच पेटवायचे मनसुबे आहेत, याची या तरुणांना जाण तरी असेल का ? आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी खरोखरच लढण्याची वेळ आली, तर हंडी फोडणार्या माखनचोर कृष्णानेच ‘पार्था, शस्त्र उचल म्हटल्याचे यांना स्मरेल का ?’
श्री गणेशाच्या आगमनाची जोरदार सिद्धता चालू आहे. ढोल-ताशा वादनाची असंख्य ‘रिल्स’ (छोटी ध्वनीचित्रफीत) पाहिल्या. ‘काय त्वेषाने वाजवतात मुली, कमाल आहे’; पण त्या ‘गणरायाने सुद्धा महिलांचे सैन्य उभारले’, हे या मुलींना ठाऊक असेल का ? आणि वेळ आली, तर त्याच त्वेषाने मुली लढू शकतील का ? त्यांचे भाऊ, मित्र, प्रियकर त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरतील का ? श्रीराममंदिराच्या निर्मितीच्या वेळी काय जल्लोष केला आपण ? पण तेच आपण ‘धनुर्धारी रामाची सेना होऊ शकू का ?’ ‘‘तुम्ही श्रीराममंदिर बांधले, आमची सत्ता आली की, आम्ही ते तोडू’’, अशी गरळ ओकणार्यांची सत्ता आम्हीच आमच्या मूर्खपणाने येऊ दिली, तर मंदिराचे संरक्षण करण्याची शक्ती आपल्यात आहे का ?
‘सेक्युलरीझम’चे (निधर्मीपणाचे) गळे काढणारे स्वत:लाच वाचवू शकणार नाहीत, तर ते तुमच्या देशाला, तुम्हाला, तुमचे मंदिरे यांचे काय वाचवू शकणार आहेत ?
३. हिंदूंनी ‘आर्थिक प्रहार’ हे शस्त्र परजण्याची आवश्यकता !
बांगलादेशामधील अत्याचार तुमच्याच बांधवांवर झाले; पण ते उंबरठ्याबाहेर घडत होते. आपल्यावर ही वेळ केव्हाही आणली जाईल, हे सतत मनात येत होते; पण ‘डायरीज् ऑफ वेस्ट बंगाल’ हा हिंदी चित्रपट पाहिला आणि जाणवले की, हिंदूंवरचे संकट नुसतेच उंबरठ्याच्या आत आलेले नाही, तर खोलवर शिरलेले आहे. जागे व्हायला पुष्कळ उशीर झालेला असला, तरी अजून वेळ गेलेली नाही. शस्त्र आपण चालवू शकत नाही; पण ‘आर्थिक प्रहार’ हे एक शस्त्र आपण परजू शकतो. आज बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांनी रस्त्यावरचे सगळे व्यवसाय कह्यात घेतले आहेत अन् त्यांच्याकडून खरेदी करून आपणच या सापांना पोसत आहोत. आज महाराष्ट्रात तब्बल ८० लाखांहून अधिक बांगलादेशी घुसखोर आहेत. त्यामुळे आता तरी जागे व्हा.
४. हिंदूंकडून खरेदी करा !
सणासुदीचे दिवस आहेत, आपल्याच बांधवांकडून खरेदी करा. आपल्या खिशातील पैसा कुणाला द्यायचा ते ठरवण्याचा अधिकार स्वतःचा आहे. आपल्या देवांना शुद्ध प्रसाद, फुले तर हवीच; पण सजावटसुद्धा शुद्ध हवी. आपल्याला प्रसाद, फुले थुंकलेली चालणार नाहीत. मग मूर्ती भ्रष्ट केलेली कशी चालेल ? आपला देव त्यांच्यासाठी सैतान आहे. त्यामुळे ‘खरेदी आपल्या माणसाकडून करा आणि आपल्या माणसांची आर्थिक शक्ती वाढवा’, हे एवढेच युद्ध लढणे आपल्या हाती उरले आहे.
नुकतेच ‘ओम प्रतिष्ठान’ने ‘ॐ हिंदु शुद्धता प्रमाणपत्र’ द्यायला प्रारंभ केला आहे. हिंदूंची श्रद्धा पाळणार्या व्यावसायिकांना, अगदी रस्त्यावरील विक्रेत्यांनाही प्रमाणपत्रे वितरित करण्यास प्रारंभ झाला आहे. आधुनिक ‘क्यू.आर्. कोड’ वापरल्यामुळे या प्रमाणपत्रांची नक्कल करणे अशक्य आहे आणि त्यारून कोड लगेच प्रमाणपत्र खरे कि खोटे ? ते कळेल. घुसखोरांना हाकलायचे असेल, स्वतःसह आपल्या लेकीसुनांचे रक्षण करायचे असेल, तर हिंदूंना जागे व्हावेच लागेल. नाही तर हे हिंदु बांधवा समजून घे की, आता तुझे केवळ काही श्वासच उरले आहेत !
– मंजिरी मराठे, कोषाध्यक्षा, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई. (१.९.२०२४)
(साभार : फेसबुक)
संपादकीय भूमिकाधर्मांधांच्या विविध क्लृप्त्या आणि जिहाद यांच्या विरोधात हिंदूंनी संघटित होण्यासह ‘आर्थिक प्रहारा’चे शस्त्र निपजायला हवे ! |