‘कैलास-मानससरोवर’ येथील दिव्यात्मे आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे स्मरण केल्यानंतर त्यांच्यासह सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचेही दर्शन होणे
१. नामजप करतांना ज्योतींच्या रूपातील दिव्यात्मे आणि ध्यानस्थ श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दर्शन होणे : ‘३.४.२०२२ या दिवशी सकाळी ९.४५ वाजता मी ‘महाशून्य’ हा नामजप करत होते. नामजप करत असतांना मी काही क्षण मानससरोवर येथील ज्योतींच्या रूपातील दिव्यात्म्यांचे स्मरण केले. तेव्हा ते तेजस्वी दिव्यात्मे माझ्या डोळ्यांसमोर आले, तसेच ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ तेथे ध्यान लावून बसल्या आहेत’, असे दृश्य मला दिसले. (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ महर्षींच्या आज्ञेने तीर्थयात्रा करत असतांना ‘कैलास-मानससरोवर’ येथे गेल्या होत्या. त्यांच्या कैलासयात्रेचे चित्रण आश्रमातील सर्व साधकांना दाखवले होते.)
२. तेजस्वी दिव्यात्मे पहातांना भाव जागृत होऊन कृतज्ञता वाटणे : ते तेजस्वी दिव्यात्मे पहातांना माझा भाव जागृत झाला. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यामुळे मला मानससरोवराचे बसल्या बसल्या दर्शन होत आहे’, याविषयी कृतज्ञता व्यक्त होत होती. तेव्हा मला वाटले, ‘ते दिव्यात्मे किती तेजस्वी आहेत ! त्यांच्या दर्शनाने जणू माझे भाग्यच उजळले आहे.’ त्यानंतर मी डोळे उघडले.
३. नामजप झाल्यावर काही क्षणांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे : नामजप झाल्यावर मी मार्गिकेत जाऊन आश्रमातील ध्यानमंदिराच्या शेजारी असलेल्या औदुंबराच्या झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना पहात होते. त्यानंतर २ सेकंदांतच मला तेथे परात्पर गुरु डॉ. आठवले आलेले दिसले आणि काही क्षणातच ते अंतर्धान पावले. त्या वेळी माझ्याकडून आपोआप कृतज्ञता व्यक्त झाली.
दिव्यात्मे आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या स्मरणामुळे त्यांच्या समवेत शिवस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे दर्शन होण्याचे भाग्य मला लाभले, यासाठी मी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.४.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |