साधू आणि दुर्जन कुणाला म्हणावे ?
प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !
प्रश्न : कीदृशः च स्मृतः साधुः ?
अर्थ : कुणाला साधु (सत्पुरुष) समजावे ?
उत्तर : सर्वभूतहितः साधुः ।
अर्थ : सर्व प्राणिमात्रांच्या हिताची चिंता वहाणारा किंवा त्यासाठी जो प्रयत्नशील असतो, तो साधू (सत्पुरुष) होय.
प्रश्न : असाधुः कीदृशः स्मृतः ?
अर्थ : असाधू (दुर्जन) कुणास म्हणावे ?
उत्तर : असाधुः निर्दयः स्मृतः ।
अर्थ : जो निर्दयी आहे, त्याला दुर्जन समजावे.
ज्याला कुणाची कीव येत नाही, दया येत नाही, आपद्ग्रस्ताला पाहून ज्याला कळवळा येत नाही, स्वार्थासाठी कुणालाही लुबाडण्यास, क्रौर्याने वागण्यास, कुणाचाही घात करण्यास जो मागे-पुढे पहात नाही, अशा दुष्ट व्यक्तीला दुर्जन समजावे. भर्तृहरीने अशा लोकांना ‘राक्षस’ म्हटले आहे.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)
(साभार : ‘यक्षप्रश्न’ या ग्रंथातून)