प्राचार्य मोहसीन अली यांच्यावर हिंदु विद्यार्थ्यांना मनगटावर लालदोरा आणि कपाळावर टिळा लावण्यापासून रोखल्याचा आरोप
अमरोहा (उत्तरप्रदेश) येथील पियर्स चढ्ढा महाविद्यालयामधील घटना
अमरोहा (उत्तरप्रदेश) – येथील पियर्स चढ्ढा महाविद्यालयामधील हिंदु विद्यार्थ्यांनी तेथील प्राचार्य मोहसीन अली यांनी त्यांना मनगटावर लालदोरा बांधण्यापासून आणि कपाळावर टिळा लावण्यापासून रोखल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित विद्यार्थ्यांनी आंदोलन करत मोहसीन अली यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
हिंदु विद्यार्थ्यांनी सांगितले की, मोहसीन अली यांचे मुसलमान विद्यार्थ्यांशी असलेले वागणे पूर्णपणे वेगळे आहे. मुसलमान विद्यार्थ्यांना वर्गात नियमित प्रार्थनेच्या वेळी हात न जोडण्याविषयी सांगितले जाते, तसेच त्यांना शुक्रवारी सुटी देण्यात येते. मोहसीन अली यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशातील भाजप सरकारने याची चौकशी करून कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते ! |