गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आणखी ४ संशयितांना कर्नाटक उच्च न्यायालयाकडून जामीन संमत
बेंगळूरू (कर्नाटक) – गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित भरत कुरणे, सुधन्वा गोंधळेकर, सुजित कुमार आणि श्रीकांत पांगरकर यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने ४ सप्टेंबर या दिवशी जामीन संमत केला आहे. संशयितांच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता अरुण श्याम, अधिवक्ता अमर कोर्रीया, अधिवक्त्या दिव्या बाळेहित्तलु आणि अधिवक्ता उमाशंकर मेगुंडी यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली. विशेष सरकारी अधिवक्ता अशोक नायक यांनी राज्य सरकारच्या वतीने बाजू मंडली. या प्रकरणात मागील ८ महिन्यांत ४ संशयितांना जामीन मिळाला असून आता जामीन मिळालेल्यांची एकूण संख्या ८ झाली आहे.