खोटे गुन्हे नोंदवून केलेल्या हिंदूंच्या अटकेचा सकल हिंदु महासंघाकडून निषेध !
|
जळगाव, ५ सप्टेंबर (वार्ता.) – धुळे-सी.एस्.एम्.टी. एक्सप्रेसमधून बैलाचे मांस घेऊन जाणार्या धुळे येथील अशरफ अली सय्यद हुसेन (वय ७२ वर्षे) यांना हटकले म्हणून धुळे येथील हिंदु तरुणांवर खोटे गुन्हे नोंद केले आहेत. या घटनेविषयी हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस अधीक्षक आणि मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या दबावामुळेच संबंधित हिंदु तरुणांवर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे, असा आरोप करून धुळे येथील सकल हिंदु महासंघाने खोट्या गुन्ह्याचा निषेध केला आहे.
पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,…
१. अशरफ यांच्याकडे बैलाचे मांस असल्याचे आढळल्यावर संबंधित तरुणांनी तक्रार करण्यासाठी त्यांना पोलीस ठाण्यात नेले; मात्र पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता गुन्हा नोंद करण्यास नकार दिला आणि हिंदु तरुणांना हाकलले.
२. नंतर २ दिवसांनी धर्मांध अशरफ यांनी हिंदु तरुणांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी वाढीव कलम लावून हिंदु तरुण सर्वश्री आकाश पवार, नीतेश अहिरे, जयेश मोहिते यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे. या तरुणांच्या भवितव्यावर वाईट परिणाम करण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणा करत आहे. या तरुणांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत.
३. धर्मांध अशरफ यांनी त्यांच्या खिशातून २ सहस्र ८०० रुपये गहाळ झाल्याचे सांगितले. जितेंद्र आव्हाड हिंदुविरोधी असून त्यांनी पोलीस भरतीसाठी जाणार्या धुळे येथील हिंदु तरुणांना खोट्या गुन्ह्यात जाणीवपूर्वक गोवले आहे.
४. जितेंद्र आव्हाड यांनी केलेले कृत्य आणि त्यांच्या राजकीय दबावाला बळी पडलेली पोलीस यंत्रणा यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.
५. खोट्या स्वरूपाच्या नोंद केलेल्या गुन्ह्याची सखोल चौकशी व्हावी. हा खोटा गुन्हा नोंद केला; म्हणून दोषी पोलिसांना त्वरित निलंबित करावे.
निवेदन देतांना सर्वश्री उमेश चौधरी, प्रभा परदेशी, पंकज धात्रक, योगेश भोकरे, मनोज घोडके, मयुरेश जगताप, विशाल शर्मा, अधिवक्ता अमित दुसाने, आशा पाटील यांच्यासह काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रकरणी धुळे येथे सकल हिंदु महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्यमंत्री कार्यालय येथे निवेदन पाठवण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंना हाकलणारे आणि धर्मांधांच्या तक्रारीची लगेचच नोंद घेणारे दुटप्पी पोलीस ! अशा पोलिसांना हिंदूंनी संघटित होऊन वेळीच खडसवावे ! |