एस्.टी. कर्मचार्यांच्या वेतनामध्ये ६ सहस्र ५०० रुपयांची वाढ ! – मुख्यमंत्री
संप मागे
मुंबई – राज्य परिवहन महामंडळातील (एस्.टी.) कर्मचार्यांच्या मूळ वेतनामध्ये एप्रिल २०२० पासून ६ सहस्र ५०० रुपयांची वाढ करण्यात येईल, हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. या निर्णयाचे ‘एस्.टी कर्मचारी कृती संघटने’ने स्वागत करत संप मागे घेतला. त्यामुळे गणपतीसाठी गावाला जाणार्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला; मात्र सणासुदीच्या काळात लोकांना वेठीस धरल्याविषयी मुख्यमंत्र्यांनी खेद व्यक्त केला.