Varaha Jayanti : ६ सप्टेंबरला ‘वराह जयंती’ मोठ्या प्रमाणात साजरी करा ! – आमदार नितेश राणे
भाजपचे आमदार नितेश राणे यांचे हिंदूंना आवाहन !
मुंबई – भाद्रपद शुक्ल तृतीयेला म्हणजेच ६ सप्टेंबर या दिवशी वराह जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करा, असे आवाहन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी समस्त हिंदु बांधवांना केले आहे. ‘भगवान विष्णूच्या १० अवतारांपैकी वराह हा त्यांचा तिसरा अवतार !
Celebrate Varaha Jayanti on September 6th with great fervour ! – BJP MLA @NiteshNRane appeals to Hindus
नितेश राणे I वराह जयंती #HinduFestivals #VarahaJayanti pic.twitter.com/7eIzXko8CJ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 5, 2024
ज्याप्रमाणे सर्व सण आपण मोठ्या उत्साहात साजरे करतो, प्रत्येक जयंतीला कुटुंबासह हिंदूंची एकजूट दाखवतो, त्याच पद्धतीने ६ सप्टेंबर या दिवशी वराह जयंतीच्या निमित्ताने हिंदु समाज म्हणून आपल्याला प्रत्येक ठिकाणी वराह जयंती साजरी करायची आहे’, असे त्यांनी सांगितले आहे.